शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या गावकरीला विरोधात कारवाई करा शाळा प्रशासनाची मागणी…
संपूर्ण राज्यामध्ये सध्या बारावीच्या परीक्षेचे फॉर्म भरणे सुरू आहे अशातच धुळे तालुक्यातील आर्वी येथील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या सोनुबाई शंकर शेंणगे परिवार महाविद्यालय फॉर्म भरण्यावरून काही पालकांनी धुडगूस घातला हा वाद इतका विकोपाला गेला की पालकांनी गावातील काही गावगुंडांना घेऊन शाळेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत दगडफेक केली…
यावेळी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या शाळेच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्ही शाळेला टाळे ठोकून काम बंद आंदोलन करू अशी आक्रमक भूमिका शाळा प्रशासनाने घेतली आहे

धुळे तालुक्यातील आर्वी गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत सध्या बारावीच्या परीक्षेचे फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. दरम्यान यावेळी बारावीच्या विद्यार्थिनीला न आणत पालकांनी फॉर्म भरून घेण्यास कर्मचाऱ्याकडे आग्रह धरला. मात्र कर्मचाऱ्यांनी सांगितले की, या ठिकाणी विद्यार्थिनी स्वतः यावे लागेल याचा राग आल्याने विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करीत जिवे ठार मारायची धमकी दिली…

आणि काही वेळातच गावातील गावगुंड बाबुराज कान्होर, किशोर आल्होर यांनी आपल्या साथीदारांसह शाळेचे लिपिक पंकज घोरपडे यांना बेदम मारहाण करत बारावीचे विद्यार्थ्यांचे फॉर्म फाडत 25 हजार रोख रक्कम घेऊन पसार झाले असल्याचा गंभीर आरोप मुख्याध्यापकांनी केला आहे… याप्रकरणी आता पोलिसांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून या संदर्भात गुन्हा दाखल करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे…













