चोरट्यांना त्वरीत अटक करा. असोसिएशन ऑफ बिझनेस कॉमर्स ची मागणी
धुळे :- धुळ्यातील ग.नं. ४ मधील धुलीया ट्रेडर्सचे मालक श्री. गोकुळ गंगाधर बधान हे काल रात्री ९.०० वाजता आपली दुकान बंद करीत असतांना त्यांच्या दुचाकीवर ठेवलेली लाखो रुपयांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी क्षणात लांबवली हा प्रकार त्वरित थांबवा असे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

घटनेमुळे सदर व्यापारी हादरले आहेत व्यापाऱ्यांनी असे सांगितले की त्या ठिकाणी आरडाओरडा करुन आजुबाजुच्या लोकांना गोळा केले. परंतु त्या आधीच चोरटा दुचाकीवरुन पसार झाला होता. सदर घटनेमुळे बाजारपेठेतील व्यापारी भयभयीत झाले असुन व्यापारांची सुरक्षा ऐरणीवर आली असुन चोरट्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी असोसिएशन ऑफ बिजनेस कॉमर्स (ABCD) या व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी केले आहे.
धुळ्यातील ग.नं.४, ग.नं.३, उसगल्ली या भागात किराणा होलसेल व्यापारीची मोठी बाजारपेठ आहे. दररोज करोडो रुपयांची उलाढाल या बाजारपेठांमध्ये होत असते. दररोज सायंकाळी उर्वरीत रक्कम व्यापारी आपल्या घरी नेत असतात. दररोजचा हा नित्यक्रम चोरट्यांना माहिती असल्यामुळे त्यांचे चांगलेच फावले आहे. एखाद्या दुकानावर रेकी करायची आणि एखाद्या बेसावध क्षणी व्यापाऱ्यांना लुटायचे हा चोट्यांचा धंदा बनला आहे. मागे सुद्धा अनेक चोरीच्याघटना या भागात घडल्या आहे. परंतु अजुनपर्यंत पोलीस सदर घटनांचा तपास करु शकलेकले नाही असा आरोप देखील या ठिकाणी केला आहे.बाजारातील वाढती स्पर्धा, किंमतीचे चढउतार या दुष्टचक्रात व्यापारी आधीच अडकला आहे आणि अशातच या चोरीच्या घटनेमुळ व्यापारी हतबल झाला आहे. म्हणून सदर बाजारपेठेमध्ये पोलीसांनी आपली गस्त वाढवावी व सदर चोरीचा तपास करुन व्यापारांना त्वरीत न्याय द्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या ठिकाणी असोसिएशन ऑफ बिजनेस अॅण्ड कॉमर्स (ABCD) या व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचा, उपाध्यक्ष, गोकुळ बधाण, खजिनदार सुधाकर पाचपुते, सेक्रेटरी किशोर गिंदोडीया, नितीन मोदी, घनःश्याम खंडेलवाल, राम रोहिडा, अमोल भोकरे, ललीत वाणी, आदि उपस्थित होते.












