धुळे : कोजागिरी पूर्वीचे अवचित साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र वाणी युवा मंच तर्फे मोठा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे प्रायोजक धुळे मनपा माजी अभियंता कैलास शिंदे व सामाजिक कार्यकर्ता माननीय सौ प्रतिभा शिंदे या होत्या
या ठिकाणी शेकडो महिलांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर कार्यक्रम घेऊन आनंदमय वातावरण तयार करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे मा.सौं. अल्पा भाभी अनुप अग्रवाल, भाजपा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजपा प्रदेश मंत्री सुशील महाजन हे उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून मनोगत व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे विशेष सहकार्य म्हणून नाशिककर ज्वेलर्स व चंद्रकांत अँड कंपनी यांनी केले. महिलांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर कार्यक्रमात पाच भाग्यवान महिलांना पैठणी देण्यात आल्या व एक भाग्यवान महिलेला चांदीची लक्ष्मी देण्यात आली.













