धुळे: शहरातुन १४५ वर्षांची परंपरा असलेला श्री बालाजी भगवानांचा रथ हा निघत असतो त्याचप्रमाणे यावर्षी देखील धुळे शहरातील बालाजी मंदिर येथून रथाला सुरुवात झाली आहे व पहिल्याच दिवशी हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत.
रथोत्सव निमित्त ९ दिवस बालाजींचे वहन काढण्यात येते. रथाच्या पहिल्या आरतीचा मान हा स्व. बाबुलाल बालाराम अग्रवाल यांचे वारसदार श्री. कमलनयन बाबुलाल अग्रवाल, सौ. मंगलबाई कमलनयन अग्रवाल, मयुरेश कमलनयन अग्रवाल, कल्पेश कमलनयन अग्रवाल, सौ. वर्षा मयुरेश अग्रवाल, उज्वला कल्पेश अग्रवाल, कु. खुशी, योगिता, वैशाली, चि. गोविंदा अग्रवाल, चि. कार्तिकेय अग्रवाल यांना पहिला मान मिळत आहे धुळे शहरातुन निघणाऱ्या भगवान बालार्जीच्या रथाचे हे १४६ वे वर्ष असून या स्थावरील श्री बालाजीची मुर्ती ही कै. विष्णु प्रसादजी काकड यांचे आजोबा कै. रामनारायणजी महाराज यांनी आणली होती. कै. रामनारायणजी महाराज यांच्या स्वप्नात श्री बालाजी भगवान यांनी येवून त्यांना साक्षात्कार दिला की, ही मुर्ती कोकणातील रत्नागिरी येथील पाचपिंपळा जवळील विहीरीमध्ये आहे असे सांगितले. त्यानुसार कै. रामनारायणजी महाराज यांनी ती मुर्ती धुळे येथे आणून प्राण प्रतिष्ठा करुन बसविली. तसेच स्था करिता राजस्थान येथून उत्तम कारागीर आणून कै. बाबुलाल बालाराम अग्रवाल यांनी रथाची स्थापना केली व त्या रथात मुतीं बसवुन रथोत्सवाची सुरुवात केली.

तेव्हा पासून आजपर्यंत प्रथम आरतीचा मान कै. बाबुलाल बालाराम अग्रवाल यांच्या नंतर त्यांचे वारसदार हेच प्रामुख्याने प्रथम आरती करताता. त्यानंतर रथोत्सव सुरु होतो. रथोत्सवानिमित नवरात्रीचे संपूर्ण ११ दिवस ते रोज बालाजीचे वहन निघतात. त्यांच्या सायंकाळी ७.३० वाजता व मोठ्या रथाच्या दिवशी पहिल्या आरतीचा मान अग्रवाल परिवार करीत आहे.धुळे शहराला अग्रवाल परिवाराने मोठी संस्कृती दिली असुन त्यामुळे धुळे शहरात एक मोठ्या उत्सवाची परंपरा चालु आहे व लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेत असतात.














