धुळे : काल दिनांक 16 नोव्हेंबर रोजी धुळे तालुका हद्दीत एका खंडणी प्रकरणात संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांच्या माहितीनुसार सुनील निकम, पवन मराठे, बाप्पू अहिरे,गणेश मराठे, व त्यांच्यासोबत एका काळ्या रंगाच्या गाडीत बसलेला व्यक्ती यांनी व्यवसायिकाची गाडी थांबून दोन लाखाची खंडणी घेतली आहे सदर सर्व आरोपी फरार असून यांचा शोध सुरू आहे.
पीडित तक्रारदार यांनी अशी फिर्याद दिली आहे की आमचा ट्रान्सपोर्ट ट्रक फागणे या मार्गाने जात असताना की गणेश मराठे, पवन मराठे, सुनील निकम, बाप्पू अहिरे यांनी गाडीला कट मारण्याच्या बहाना करून हूज्जत घालून आम्ही पत्रकार आहोत दर महिन्याला आम्हाला हप्ता द्यावा लागेल अशी धमकी दिली व शिवीगाळ करून मारण्याची धमकी देखील दिली व सोबत असलेले दोन लाख रुपये हडप करण्याचे सांगण्यात येत आहे चार आरोपींचे नाव समोर आले असून 9995 नंबर च्या काळा रंगाच्या गाडीत असलेला पाचवा आरोपी हा मुख्य असल्याचा संशय आहे सदर आरोपींवर FIR NO 681/2025 नुसार BNS कलम 308/305,140/2,126/2,351/2/3 अशा कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे.













