धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी एकवीरा देवी मंदिरासमोर पादचारी पुलाचे बांधकाम करणे, मंदिराजवळील स्मशानभूमी व घाट विकसित करणे या कामांचा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला. एकविरा देवी मंदिरासमोर हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात एकवीरा देवी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, डॉ. सुशील महाजन, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, हिरामन गवळी, सुनील बैसाणे, भाजपा युवा मोर्चाचे आकाश परदेशी, शितल नवले, भगवान गवळी, पैलवान कल्याण गरुड, चेतन मंडोरे, नागसेन बोरसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता धर्मेंद्र झाल्टे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












