धुळे शहरातील देवपूरात असलेल्या नवरंग पाण्याची टाकी परिसरात सुमारे दहा कोटी रुपये खर्चाच्या कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि भाजी मंडी बांधकामाचा भूमिपूजन समारंभ राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी संपन्न झाला. नगरोत्थान योजनेतून ही विकास कामे करण्यात येत आहेत. या कामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी नामदार रावल यांच्या समवेत आमदार अनुप अग्रवाल, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, ज्येष्ठ नेते हिरामण गवळी यांच्यासह भाजपा नेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













