संबंधितांवर गुन्हा दाखल व काम बंद करण्याची मागणी
धुळे: शहरात होणाऱ्या 927 कोटीचे होत असलेल्या अंडरग्राउंड गटारी संदर्भात अनेक तक्रारी समोर आले आहेत त्याचबरोबर आज साक्री रोड भागात ह्या कोट्यावधीच्या कामात चक्क 7 ते 8 वर्षाचे चिमुकले बालकामगार आढळून आले.
सहज कंट्रक्शनच्या माध्यमातून होणाऱ्या 927 कोटीचे धुळे शहराच्या अनेक भागात अंडरग्राउंड गटारीचे काम सुरू आहे या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी असा आरोप केला आहे की गेल्या सहा महिन्यापासून या कामात मोठा भोंगळ कारभार पाहायला मिळत आहे सिंचन भवन रस्त्याजवळ सुरू असलेल्या कामात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे ह्या 927 कोटीच्या कामात बालकामगार आढळून आले या कामाच्या ठिकाणी चक्क ७ ते ८ वर्षाचे लहान मुलं सिमेंट माल तयार करत असताना दिसले या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल यांनी असे सांगितले की या कामासंदर्भात अनेक तक्रारी येत असताना या ठिकाणी बालकामगार आढळून आले आहे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे व तात्काळ हे काम बंद करण्याची मागणी देखील केली आहे.













