धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी असलेल्या सिद्धेश्वर गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर ते मोठा पूल व झाशी राणी पुतळा ते अग्रवाल भवन पर्यंत व्हाईट टॉपिंग रस्ता कॉंक्रीट कामाचा भूमिपूजन समारंभ राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते दिनांक 15 डिसेंबर रोजी संपन्न झाला. याप्रसंगी माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे,
आमदार अनुप अग्रवाल, डॉ. सुशील महाजन, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, हिरामन गवळी, सुनील बैसाणे, भाजपा युवा मोर्चाचे आकाश परदेशी, शितल नवले, भगवान गवळी, पैलवान कल्याण गरुड, चेतन मंडोरे, वैभवी दुसाने, अमोल मासुळे, नागसेन बोरसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता धर्मेंद्र झाल्टे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













