धुळे महानगरातील मोहाडी उपनगरात माजी नगरसेवक राजू पवार, प्रवीण पवार आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अथक परिश्रम आणि सर्व आवश्यक परवानग्या घेऊन शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून अत्यंत रुबाबदार असा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते दिनांक 15 डिसेंबर रोजी शानदार उद्घाटन करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याला आ. अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आ. राम भदाणे, माजी नगरसेवक राजू पवार, प्रवीण पवार, भाजपा महानगरप्रमुख गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, डॉ. सुशील महाजन, डॉ. माधुरी बाफना, नारायण पाटील, ललित माळी यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी, भाजपा नेते, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













