साक्री येथील दिव्यांग पत्रकार शैलेश गादेकर याच्या विषयी ‘लंगड्या’ असा अपमानजनक शब्द वापरून हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्या पीएसआय महेश गायताड यांच्याविरुद्ध कारवाई करा अशी मागणी करीत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, साक्री पोलीस ठाण्यातील पीएसआय महेश गायकवाड यांनी एका पत्रकारास अपमान जनक वागणूक दिली. तसेच दिव्यांग पत्रकार शैलेश गादेकर यांच्या विषयी ‘लंगड्या’ असा अपमानजनक शब्द वापरला.
तो लंगड्या फार मातून गेला आहे. त्याचे हातपाय तोडणार. अशी धमकीही पीएसआय गायताड यांनी दिली. पोलीस खात्यातील जबाबदार अधिकारी दिव्यांग पत्रकाराविषयी अशा प्रकारचे अपशब्द वापरत असेल तर तो सर्वसामान्य जनतेशी कसा वागत असेल याचा यावरून अंदाज येतो. म्हणून अशा मुजोर पीएसआय महेश गायताड यांच्याविरुद्ध कारवाई करा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, विद्यमान अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सचिन बागुल, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाठ, कार्यकारिणी सदस्य कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरे, रवींद्र नगराळे, पंकज पाटील, आकाश सोनवणे, मनीष मासुळे, दीपक वाघ, संदीप त्रिभुवन, संदेश अहिरे आधी पत्रकार बंधू उपस्थित होते.












