लाख निष्पक विभागाने सलग दुसऱ्या दिवशी देखील कारवाई केली आहे या कारवाईत औषध निरीक्षक धुळे त्यांच्यासह एका खाजगी व्यक्ती ला दुकानाचा परवाना मिळण्यासाठी लाच घेताना पकडले आहे.
या कारवाईची सविस्तर माहिती अशी आहे की तक्रारदार यांना शिरपूर येथे पशुपक्षी फार्मचे दुकान सुरू करावयाचे असल्याने त्यांनी दुकानाचा परवाना मिळणे करिता दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी अन्न व औषध प्रशासन धुळे विभागाकडे ऑनलाइन अर्ज केला होता. सदर अर्जाबाबत तक्रारदार व त्यांचा आते भाऊ यांनी अन्न औषध निरीक्षक यांची त्यांचे कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना ते शिरपूर येथे आरोपी क्र. 02 यांचे सह दि. 04.03.2025 रोजी त्यांचे दुकानावर येऊन स्थळ परीक्षण करतील तेव्हा आरोपी क्र. 02 यांच्याकडे 8,000/- रुपये द्यावे लागतील त्याशिवाय मी पुढील कार्यवाही करणार नाही असे सांगितल्याने तक्रारदार यांनी दि.04 मार्च रोजी तक्रार दिली होती. सदर तक्रारीची दि. 04 मार्च रोजी पडताळणी केली असता औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी तक्रारदार यांच्या दुकानाचे स्थळ निरीक्षण केले तेव्हा त्यांच्यासोबत आलेले खाजगी इसम तुषार जैन यांनी तक्रारदार यांच्याकडे 8000/- रुपये लाचेची मागणी करून औषध निरीक्षक देशमुख यांनी तक्रारदार यांना लाच देण्यास दुजोरा देऊन प्रोत्साहित केले होते. व आज दि. 11 रोजी सापळा लावला असता खाजगी इसम तुषार जैन यांनी पंचासमक्ष तक्रार यांच्याकडे लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारली तेव्हा आरोपी औषध निरीक्षक व आरोपी क्र. 02 यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे














