25 हजार रुपये किमतीच्या नकली नोटांसह तरुण अटकेत
धुळे: महामार्गावरील एका ढाब्याजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणाला आझाद नगर पोलिसांनी ताब्यात घेतले असता मोठा बनावट नोटांचा कट उघडकीस आला आहे. शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील दिलीप पावरा या तरुणाकडे ₹500 आणि ₹200च्या बनावट नोटा मिळून एकूण ₹25 हजाराच्या बनावट रोकड जप्त करण्यात आला.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत हा तरुण पकडला असून त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. या नोटा तो कुठून आणल्या आणि कुणाकडे देणार होता? या संदर्भात मोठा तपास सुरू असल्याचे आझाद नगर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक पवार यांनी या ठिकाणी सांगितले.यापूर्वी धुळे जिल्ह्यात यात्रोत्सवाच्या वेळीही मोठ्या प्रमाणात नकली नोटांचे रॅकेट उघडकीस आले होते. आता पुन्हा अशा प्रकारची घटना समोर आल्याने बनावट नोटांचे जाळे जिल्ह्यात सक्रिय झाले का? याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पोलीस विविध भागात तपास करत आहेत.

नकली नोटा 👇🏻

