फागणे गावात सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न
धुळे : माजी लोकनियुक्त सरपंच विलास वसंतराव चौधरी यांना लोकमत वृत्तपत्र समूहाचा तर्फे मानाचा “लोकनायक” पुरस्कार मिळाला आहे व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या शिवसेना धुळे जिल्हा समन्वयक” पदी निवड झाल्यामुळे सगळीकडे शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे व त्यांच्या फागणे या गावात जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवून मान्यवरांच्या हस्ते गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांतर्फे त्यांच्या सन्मान करण्यात आला.
ह्या ठिकाणी त्यांच्या केलेल्या कार्याचा गवगवा करण्यात आला विलास चौधरी यांनी संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी समर्पित केले व त्यांच्या फागणे ह्या गावात केलेल्या कार्याची लोकमत वृत्त यांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिला व त्यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या शिवसेना धुळे जिल्हा समन्वयक” पदी निवड झाली म्हणून ह्या ठिकाणी सत्कार समारंभ कार्यक्रमात शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांनी देखील हजेरी लावली होती.

या कार्यक्रमात उपस्थित शिवसेनेचे अतुल भाऊ सोनवणे, शरद पाटील,कैलास पाटील,शिवाजी अहिरे,सरपंच भुरा आबा पाटील, सुरेखा ताई बडगुजर, भुषण ठाकरे,गोपी रावसाहेब, राजेश बडगुजर,विक्रम पाटील, जगदीश पाटील,सूर्यकांत पाटील,जगदीश पाटील, दीपक चौधरी, उमेश चौधरी, गौरव चौधरी,सौरत्ना पाटील, भिकन जाधव, मंदा अहिरे, सुरेश बडगुजर,भालेराव पाटील, भालचंद्र सूर्यवंशी, धनराज पाटील,साई पाटील, कुणाल पाटील, हंसराज पाटील, मोहन भिल,सुरेश मांग,बी आर सूर्यवंशी विश्वनाथ पाटील, भोला पाटील, विजय पवार, प्रसाद सोनार, विफूल पाटील, महेश अहिरे, मुकुंद बडगुजर,पंकज ठाकूर,सुनील बाविस्कर,व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

