वलवाडी नर्मदा नगर परिसरात बंदिस्त गटार व रस्ता काँक्रिटीकरण कामाचं खासदार डॉ.शोभा बच्छाव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले या ठिकाणी असंख्य स्थानिक रहिवासी व इतर नागरिक उपस्थित होते.
खासदार डॉ. सौ. शोभाताई दिनेश बच्छाव यांच्या विशेष प्रयत्नातून धुळे महानगरपालिका हद्दीत प्रभाग क्र. 6 मध्ये जिल्हा नगरोत्थान योजना 2024 – 25 अंतर्गत नर्मदानगर, वलवाडी परिसरात बंदिस्त गटार व रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा दिनांक 8 मार्च रोजी पार पडला. या प्रसंगी खासदार डॉक्टर यांच्या समवेत वलवाडीचे माजी सरपंच गुणवंत वाघ, दिनेश पाटील युवक काँग्रेस सचिव राहुल माणिक, शिवसेना शहर प्रमुख शैलेश सोनार, प्रकाश भदाणे, नानासाहेब शशिकांत भदाणे, हिमांशू भदाने यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिला उपस्थित होते.

