जागतिक महिला दिनानिमित्त धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई दिनेश बच्छाव यांच्या वतीने समाजातील विशेष, नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार 2025 सन्मान सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी 11 वाजता
मनभावन बँकेट हॉल, गल्ली क्रं. ६, पवनपुत्र व्यायामशाळेजवळ, धुळे येथे हा सत्कार समारंभ संपन्न झाला.
याप्रसंगी मंचावर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई दिनेश बच्छाव, धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, माजी महापौर कल्पना महाले, अप्पर तहसीलदार धुळे शहर वैशाली हिंगे, महिला जिल्हाधिकारी तेजस्विनी नरवाडे, माणिकराव पानगव्हाणेकर, शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे, स्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलका बियाणी, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, प्राध्यापक बाबा हातेकर, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीतराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी प्रास्ताविकातून मांडली. आज समाजात श्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक महिला आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपली स्वतःची ओळख आणि योग्यता सिद्ध करतात. अशा महिलांचा सन्मान होणे महत्त्वाचे आहे. त्यातूनच इतर महिलांना देखील प्रेरणा मिळते. या उरात भावनेतून सत्कार समारंभ आयोजित केल्याचे खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव म्हणाल्या. कार्यक्रमात जिल्हा परिषद माजी अध्यक्ष धरती देवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे, शिवसेना उपनेते शुभांगी पाटील, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमात विथ क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि मानवस्त्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका पुनम बेडसे यांनी केलं.
