धुळे : आज दिनांक 08 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमीत्त समाजातील कतृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, धुळे शहर विभाग, धुळे श्री. राजकुमार उपासे यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात समाजातील 1) श्रीमती निर्मलाबाई धनराज माळी, 2) श्रीमती रूकसाना बशिर अली सैय्यद, 3) श्रीमती सुमन धर्मा पवार, 4) श्रीमती रजनी हरिचंद्र ठाकरे यांचा पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार, आझादनगर पोलीस स्टेशन यांचे हस्ते पुष्पगुच्छ, साडी, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील मॅडम यांनी केले. तसेच आझादनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत महिलांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे मा.पोलीस अधिक्षक सो, धुळे मा. अपर पोलीस अधीक्षक सो, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार, सपोनि श्री. विजय ठाकुर, मपोसई राजश्री पाटील, पोहेकॉ/ मुक्तार मन्सुरी, पोहेकॉ/ राकेश खांडेकर, पोकॉ/मुजाहिद शेख यांनी आयोजन केले होते.

