धुळे : आनंदा भटा पाटील पोलीस पाटील बळसाने तालुका साक्री रा.बळसाने तालुका साक्री जिल्हा येथे असून त्यांनी तक्रारदाराच्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा जलद गतीने तपास होऊन कोर्टात दोषारोप पत्र दाखल करण्याकरिता लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले.दि.15 एप्रिल रोजी 10,000/- रु. मागणी करून तडजोड अंति 8000 /- रुपये स्वीकारण्याचे मान्य केले आहे

लाच घेण्याचे पूर्ण कारण असे होते की तक्रारदार हे बळसाने गावातील रहिवासी असून त्यांच्या पत्नीने निजामपूर पोस्टे येथे भा. द.वि. कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. सदर गावातील पोलीस पाटील श्री. आनंदा भटा पाटील यांनी तक्रारदार यांना भेटून तक्रारदार यांच्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास लवकर पूर्ण करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्याकरिता पोलिसला 10000/- रुपये द्यावे लागतील असे सांगून पोलिसांच्या नावाने लाच मा गणी केल्याची तक्रार ला. प्र. वि. धुळे कार्यालयात दिली होती.सदर तक्रारीची दिनांक 15/4/2025 रोजी पडताळणी केली असता पोलीस पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे पोलिसांच्या नावाने 10000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती8000/- रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.दिनांक 6/5/2025 रोजी सापळा कारवाई दरम्यान पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर लाचेचे रकमेंपैकी पहिला हप्ता 2000/- रुपये पंचांसमक्ष स्वतः स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया निजामपूर पोलीस स्टेशन येथे चालू आहे आरोपीच्या अंगझडतीत मिळुन आलेल्या वस्तु:- लाचेची रक्कम 2000/- रुपये आरोपी च्या ताब्यात मिळून आले आहे.आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.












