धुळे : शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांना बातमी मिळाली होती की, धुळे शहरातील सुरत बायपास रोडवर पाण्याच्या टाकी जवळ चक्करबर्डी येथे एक इसम अवैध गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे मिळालेल्या बातमी वरुन मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा.अपर पो. अधि. श्री. किशोर काळे, मा.उप वि.पो. अधि. श्री.. राजकुमार उपासे यांचे मार्गदर्शन व सुचनां प्रमाणे धुळे शहर पोलीस ठाण्याचे पो.निरी.श्री.दिपक पाटील यांनी पोलीस अंमलदार कुंदन पटाईत, राहुल सोनवणे, गौरव देवरे, महेश मोरे, राकेश मोरे, धम्मपाल वाघ, तुषार पारधी, प्रशांत नाथजोगी, योगेश ठाकुर, अमित रणमाळे, अमोल पगारे यांचे पथकाने बातमीच्या ठिकाणी पाळत ठेवुन अवैध गांजा विक्रीसाठी आलेला इसम गणेश सुरेशसिंग परदेशी रा. बुंदेलपुरा, नांदगाव रोड, येवला जि.नासिक याचेवर दुपारी २ वाजेच्या सुमारास छापा टाकुन त्यास ताब्यात घेतले असुन त्याच्या ताब्यातुन २,५०,०००/- रुपये किंमतीचा १० किलो गांजा पकडून पोहेकॉ रविकिरण राठोड यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. गणेश सुरेशसिंग परदेशी याने त्याच्या ताब्यातील गांजा हा सुनिल पावरा रा. पिरपाणी ता.शिरपुर. जि.धुळे याच्या कडून खरेदी करुन विष्णु बडोदे (पंडोरे) रा. तारगल्ली येवला जि.नासिक यास देण्यासाठी घेतल्याची कबुली दिलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास महिला सपोनि वर्षा पाटील हे करीत आहे.













