आपसी वादात तरुण जखमी सेवा हॉस्पिटल येथे उपचार सुरू
धुळे : शहरात एक हदरणारी गोष्ट घडली आहे शहरातील शंभर फुटी रोड परिसरात भर दिवसा आपसी जुन्या वादातून गोळीबार झाला आहे व त्यात एक तरुणाला पायाला गोळी लागली आहे व त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरातील मोगलाई परिसरात राहणारा शाहरुख सिद्दिकबाबू शहा याच्या पायाला गोळी लागली आहे माहितीनुसार शाहरुख शाह व त्याच्या काही मित्रांचा शंभर फुटी रोड या ठिकाणी असलेल्या मुलांची जुना वाद असल्याचे सांगण्यात येत आहे आज रोजी जखमी शाहरुख हा शंभर फुटी या ठिकाणी चहा पिण्यासाठी बसला व त्याच ठिकाणी समोरील पार्टी सोबत जुन्या विषयावरून वादविवाद झाला अशी माहिती मिळाली आहे आरोपीने गावठी कट्टा बाहेर काढल्याने त्याने पळ काढला त्या ठिकाणी शाहरुख याच्यावर गावठी पिस्टल ने चार गोळ्या झाडल्या असे सांगण्यात येत आहे परंतु त्या ठिकाणी शाहरुख शहा याला पायाला एक गोळी लागली आहे व त्याला तात्काळ साक्री रोड या ठिकाणी असलेले सेवा हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या ठिकाणी डी वाय एस पी उपासने साहेब व शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हे पुढील तपास करीत आहे व तात्काळ आरोपी पकडण्यासाठी पुढील प्रयत्न सुरू आहेत.












