पहिलीपासून हिंदी शिकवण्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील जीआर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल पत्रकार परिषद घेऊन रद्द केले आहे… ठाकरे बंधू एकत्र येत हिंदीच्या जीआर रद्द करावा यासाठी मुंबईत भव्य मोर्चा काढणार होते याच पार्श्वभूमीवर सरकारने एक पाऊल मागे घेत हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला आहे आणि आता याच पार्श्वभूमीवर आज धुळ्यात मनसे व शिवसेनेने एकत्र येत जल्लोष केला आहे….
आज धुळ्यातील जुनी महानगरपालिकेच्या समोर हिंदी सत्तेचा जीआर रद्द झाल्यामुळे मनसे व शिवसैनिकांनी एकत्र येत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला यावेळी फटाके देखील फोडण्यात आले. तसेच हा विजय मराठी माणसांचा असल्याचा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या….

बाईट: संजय सोनवणे, मनसे महानगरप्रमुख












