धुळे: जिल्ह्यातून चोरी होणाऱ्या मोटरसायकल व चोरांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की शिरपूर येथे एक इसम चोरीची बुलेट वापरत असल्याचे माहिती मिळाली
त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा पोलीस राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी व इतरांना तात्काळ त्या ठिकाणी पाठवले व शिरपूर गाठत एका इसमाला त्याब्यात घेतले व चौकशी दरम्यान समोर आले की तो वापरत असलेली बुलेट चोरीची असल्याचे सांगितले व त्यांच्या चौकशी दरम्यान मोठा खुलासा झाला की तो व त्याचा साथीदार नाशिक शहर, पुणे शहर, शिर्डी पिंपळगाव अश्या ठिकाणाहून तब्बल 14 बुलेट चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे व तपासात असे निदर्शनात आले की हे दोघं आरोपी फक्त बुलेट चोरण्यात माहीर हे होते आरोपी शिरपूर येथील खर्दे गावातील हर्षवर्धन जगदाळे व त्याचा साथीदार किरण कोळी हे मुख्य आरोपी असून सदर आरोपीकडून स्थानिक गुन्हे शाखेने 14 बुलेट ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.













