आदिवासी पेसा तेरा जिल्ह्यातील 14 संवर्गातील मानधन कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्याच्या मागणीसाठी आदिवासी १७ संवर्ग पेसा कर्मचारी संघटनेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली. तसेच संघटनेतर्फे प्रशासनाला मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटले आहे की, 17 संवर्गातील मानधन कर्मचाऱ्यांना 5 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार मानधन तत्वावर नियुक्त देण्यात आल्या होत्या.
एक वर्षाच्या आत शासनाने नियमित शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत आश्वासित केले होते मात्र यासंदर्भात पुढे कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वारंवार पुरावा करीत आम्ही संघटनेमार्फत शासनाकडे नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी मागणी करीत आहोत. त्या अनुषंगाने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. आमच्या मागण्यांवर प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कार्यवाही केली नाही तर सात जुलै रोजी चारोटी नाका पालघर ते मुंबई मंत्रालय असा पाई भव्य बिराड मोर्चा अर्थात लॉन्ग मार्च काढणार आहोत असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर पैसा कर्मचारी पल्लवी वळवी, शैलेश बहिरम, सचिन गवळी, वामन बागुल, शर्मिला चौरे, ज्योती ठाकरे, पुष्पा गवळी आदींच्या आहेत.










