किरकोळ कारणावरून धुळ्यात दोन गटात तुफान राडा…
धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या अंदरवाली मस्जिद परिसरात काल रात्री उशिरा दोन गटात वाद झाल्याची घटना घडली असून पान टपरीवरील पैशांच्या उधारीवरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे…
या परिसरात दोन्ही गटाकडून दगडफेक देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली असून या ठिकाणी पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे… रात्रीपासून या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून याप्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही मात्र पोलीस प्रशासन संबंधित परिसरावर लक्ष ठेवून असून सध्या या परिसरात शांततेचे वातावरण आहे….












