सध्या धुळे शहरातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूल हा चर्चेचा विषय ठरला आहे या ठिकाणी पालकांनी शाळेची फी न भरल्यामुळे शिक्षकांनी मुलांसोबत वाईट वागणूक केली असल्याचे पालकांनी तक्रार केली होती त्या संदर्भात मोठा गोंधळ निर्माण झाला होता व त्याच ठिकाणी चावरा शाळेने त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले होते परंतु सीसीटीव्ही फुटेज व त्या ठिकाणी असलेल्या शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टींमुळे अनेक विषय समोर आले आहेत.
त्या ठिकाणी एका शिक्षिकेने प्रसार माध्यमांशी बोलताना असे सांगितले आहे की ज्या विद्यार्थ्यांची ही बाकी होती त्यांना नवीन वर्गात गेल्यावर डिव्हिजन दिले नव्हते आम्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना अनेक दिवसापासून त्या संदर्भात सूचना देखील केल्या परंतु आमच्याकडे पर्याय नसल्याने आम्ही त्यांना लायब्ररीत बसून ठेवले असे या ठिकाणी शाळेतील महिला शिक्षिकेने सांगितले आहे.












