भीमा कोरेगावदिनी झालेला हल्ला हा सुनियोजीत कट होता. मुलतत्ववादी संघटनेने तो घडवून आणला होता. त्यांचे पितळ उघडे पडले. पोलीस यंत्रणांचे अपयशही यातून पुढे आले. याप्रकरणीचा युक्तीवाद आता पूर्ण झाला आहे. यात शरद पवार, प्रा. जोगेंद्र कवाडे, अॅड. प्रकाश आंबेडकरांसह जवळपास ८५ जणांची उलटतपासणी करण्यात आली. याप्रकरणी गठीत आयोगाचा अहवालही तयार असून तो लवकरच सरकारला सादर होईल. इतिहासाला विकृत स्वरूप देण्याचा मुलतत्वादी संघटनेचा प्रयत्न फसला असून, सरकारनेच भीमा कोरेगावचा इतिहास सत्य असल्याचे कबुल केले आहे. त्यामुळे न्याय मिळेल अशी अपेक्षा या प्रकरणात न्यायालयात लढा देणारे अॅड. किरण चन्ने यांनी येथे व्यक्त केली. एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.












