दुचाकी मालकाचे अजब आवाहन; दुचाकी कोणी जाळली सांगणाऱ्याला देणार 51 हजाराचे बक्षीस.धुळे शहरातील मिल परिसर भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी जाळण्याचे सत्र सुरूच आहे मात्र ह्या दुचाकी कोण व कशासाठी जाणत आहे हे अद्याप पर्यंत समोर येऊ शकले नाही दुचाकी जाळल्याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी करण्यात आले आहे मात्र पोलिसांकडून देखील कोणालाही याप्रकरणी अद्याप पर्यंत ताब्यात घेतले नसल्याची माहिती मिळत आहे.
पहाटेच्या सुमारास धुळे शहरातील मिल भागात असलेल्या सुदर्शन नगर मधील रोहित म्हसदे नामक तरुणाची दुचाकी अज्ञातांनी जाळून टाकली आहे. सदर घटना लक्षात येताच रोहित व त्याच्या परिवाराने दुचाकी विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती पूर्णपणे जळून खाक झाली. यावेळी रोहित म्हसदे याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमच्या भागामध्ये सतत दुचाकी जाळण्याचे प्रकार सुरू आहे मात्र अद्याप पर्यंत पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.. पहाटेच्या सुमारास माझी देखील दुचाकी जाळण्यात आली आहे, जो कोणी माझी दुचाकी कोणी जाळली हे पुराव्यासह सांगेल त्याला आम्ही 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊ असे अजब आवाहन रोहित म्हसदे यांनी यावेळी केले…













