धुळे : या ठिकाणी विद्यावर्धनी परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या विषयी शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात आले.
या ठिकाणी खराब झालेल्या रस्त्याची पूजा करून तसेच भ्रष्टाचारी पालिकेच्या कारभाराला फुले वाहून आणि नारळ फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. या ठिकाणी असे सांगितले की या भागातील नागरिकांकडून महानगरपालिकेत शंभर टक्के कर भरला जातो तरी महानगरपालिकेला या एका रस्त्यासाठी वारंवार निवेदन दिले जात आहेत या ठिकाणी आक्रोश व्यक्त करत असे सांगितले की स्वतः आयुक्त मॅडम यांनी या रस्त्याने एकदा प्रवास करावा तेव्हा या भागातील नागरिकांच्या वेदना समजतील असे या ठिकाणी सांगितले गेल्या पाच वर्षापासून भाजप सत्ता असताना या रस्त्याबाबत भाजपचे नगरसेवकांनी पालिकेत साधारण प्रश्न सुद्धा उपस्थित केला नाही त्यांनी कोणत्या महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले नाहीत असा आरोप या ठिकाणी करण्यात आला. ज्या ठिकाणी मलिदा भेटेल तिथेच त्यांनी धावपळ केली असा आरोप देखील केला.

ह्या प्रसंगी प्रभागातील स्थानिक नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते. या ठिकाणी नितीन देशमुख, सुनील पाटील, नितीन बागुल, लखन वासवानी, विनोद मिस्तरी, गणेश पाकळे, देविदास सोनवणे, खंडू सूर्यवंशी, भूषण सोनकांबळे आदी उपस्थित होते..













