गेल्या काही दिवसांपासून पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे साक्री तालुक्यातील जल प्रकल्प हे शंभर टक्के भरले असून या जलप्रकल्पामधून पांझरा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे त्यामुळे पाटबंधारे विभाग असेल तसेच जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून नदीकाठील नागरिकांना सतत त्याचा इशारा देण्यात आला आहे मात्र दुसरीकडे ज्यांच्यावर आहे जबाबदारी तेच अधिकारी कर्मचारी तसेच काही पोलीस कर्मचारी धुळे शहरातील पांझरा नदीवरील असलेल्या कालिकामाता मंदिराजवळील फरशी पूल या ठिकाणी धुळे महानगरपालिकेची अग्निशामक विभागाची गाडी लावून चक्क अधिकारी व कर्मचारी मासे पकडण्यात दंग असल्याचे चित्र पाहायला मिळाले…
एकीकडे ज्यावेळेस नैसर्गिक आपत्तीचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर नागरिकांची जबाबदारी असते त्यामुळे अनेक नागरिकांना हे अधिकारी कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून इतरांचे प्राण वाचत असतात मात्र धुळे शहरातील मनपा आपत्ती विभागाचे अधिकारी, कर्मचारी पांझरा नदीला आलेल्या पुराचा आनंद घेत त्यामध्ये चक्क मासे पकडत असताना चे चित्र एनडीटीव्हीच्या कॅमेरात कैदी झाले… त्यामुळे अग्निशमन अधिकाऱ्यांनी व आपत्ती व्यवस्थापन यांनी नागरिकांना वाऱ्यावर सोडले असून अधिकारी, कर्मचारी आपल्याच मस्तीत असल्याचे सामान्य धुळेकरांकडून बोलले जात आहे…













