समस्यांबाबतचे निवेदन देण्यासाठी गेले होते चंदू चव्हाण…
गेल्या अनेक दिवसांपासून अनेक विषयांमध्ये चर्चेत असणारे माजी सैनिक चंदू चव्हाण हे गेल्या अनेक दिवसांपासून धुळे महानगरपालिकेच्या चकरा मारत आहे त्याला कारण आहे त्यांच्या परिसरात असलेले घाणीचे साम्राज्य या संदर्भात ते वारंवार मनपाकडे पाठपुरा करून देखील त्यांच्या परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली नसल्यामुळे संतप्त चंदू चव्हाण यांनी आज अखेर आयुक्त यांच्या त्यांना बाहेर जोरदार आंदोलन केले.
दरम्यान चंदू चव्हाण यांना तेथून हटवण्यासाठी मनपा प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी युवराज खरात यांनी मारहाण केल्याचे एका व्हिडिओ मधून समोर आले आहे. आता याच व्हिडिओच्या माध्यमातून धुळे मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात संतापची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे… त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओच्या आधारे मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील ह्या मुजोर अधिकारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचा असणार आहे…












