धुळे : दिनांक ११ जुलै रोजी संपूर्ण देशभर प्रदर्शित होणारा उदयपूर फाईल या चित्रपटाचा ट्रेलर पाहून मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप व अस्वस्थता पसरलेली असल्याने अल्पसंख्यांक विकास मंडळ यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना नियोजन देण्यात आले.

या निवेदनात असे म्हटले आहे की सदर चित्रपटामध्ये इस्लाम धर्म, मुस्लिम उलेमा आणि पैगंबर हजरत मुहम्मद (स.अ.) यांच्या जीवनाबाबत आक्षेपार्ह दृश्ये आणि संवाद दाखवले गेले आहेत, जे केवळ चुकीच्या माहितीवर आधारित असून, समाजामध्ये फूट पाडणारे आहेत. यामध्ये ज्ञानव्यापी मशिदीबाबत सध्या न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणाचे खोटे आणि भडक रूपांतर करून ते चित्रित करण्यात आले आहे, जे समाजात द्वेष निर्माण करू शकते असे या निवेदनात म्हटले आहे.या चित्रपटामुळे समाजात धार्मिक तेढ वाढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचे केंद्र असून, येथे सर्वधर्मीय जनता शांततेत व बंधुभावाने राहत आहे.
अशा परिस्थितीत अशा चित्रपटाचे प्रदर्शन राज्यात होणे हे समाजविघातक ठरू शकते.अत्यंत नम्र विनंती आहे की, उदयपुर फाईल या चित्रपटाच्या महाराष्ट्रातील प्रदर्शनास तात्काळ बंदी घालण्यात यावी, जेणेकरून राज्यातील सामाजिक सलोखा अबाधित राहील अशाप्रकारे निवेदनाच्या माध्यमातून विनंती करण्यात आली.













