पत्रकार मिलिंद बैसाणे यांनी पत्रकार परिषदेत टाटा मोटर्स आणि उज्वल ऑटोमोटिव्हज यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे. यावर उज्वल ऑटोमोटिव्हज यांना विचारणा केली असता त्यांचे जनरल मॅनेजर आनंद म्हस्के यांनी याबाबत खुलासा केला. म्हस्के यांनी सांगितलं की मिलिंद बैसाने यांनी आमच्याकडून घेतलेल्या टाटा टिगोर वाहनाच्या संदर्भात केलेला तिसरा क्लेम हा इन्शुरन्स पॉलिसीच्या नियमात बसत नाही.
इन्शुरन्स नियमानुसार दोन क्लेम मंजूर केले जातात. यापूर्वीच सदर वाहना बाबत बैसाने यांचे दोन क्लेम लागू झाले आहेत. तिसरा क्लेम नियमात बसत नाही. नियमानुसार 50% रक्कम बैसाने यांना भरावी लागेल. ती भरून बैसाणे यांनी आम्हास सहकार्य करावे असे आवाहन आनंद म्हस्के यांनी केलं.













