धुळे: शहरात भाजप आमदार अनुप अग्रवाल,भाजप अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धुळे शहराच्या कानाकोपऱ्यात हजारो रक्तदात्यांचे रक्तदान शिबीर आयोजित होते त्याचप्रमाणे छत्रपती अग्रसेन चौकात भाजप मंडळ अध्यक्ष ईश्वर पाटील व गणेश पाटील यांच्या
नियोजनाने सर्व तरुण वर्गाने सहकार्य करून या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले होते व शेकडो रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा अनोखा वाढदिवस साजरा केला. या ठिकाणी ईश्वर पाटील, गणेश पाटील चेतन सोनार सुशील वर्मा व असंख्य तरुण उपस्थित होते.













