धुळ्यात आंबेडकरी समाजातर्फे निदर्शने
धुळे : सध्या सर न्यायाधीश गवई भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अनेक विचित्र घटना घडत आहेत त्यासंदर्भात धुळे शहरात आंबेडकरी समाजाच्या वतीने तोंडाला काळी पट्टी बांधून निदर्शने करण्यात आले
या ठिकाणी असे सांगितले की सी.जे.आय. गवई साहेबांना अनिरुध्दचारी (तिवारी) याने छाती फाडण्याची धमकी दिली आणि ज्याने भर कोर्टात सीजेआय यांच्यावर बुट मारुन फेकाल तो अॅड. राकेश किशोर (तिवारी) व ज्यांनी फेसबुकवर साहेबांवर जातीवादी कमेंट केल्या त्याच्यावर देशद्रोहाचा कार्य केले, संविधानाचा अवमान केला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागण्या या ठिकाणी करण्यात आले आहे.
सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात दिल्ली येथे जो काही हल्ला झाला आहे. आणि ज्यांनी केला तो वकील १) राकेश किशोर (तिवारी) याने बुट मारुन फेकला, त्याच्यावर आणि ज्याने गवई साहेबांचे पोट चिरण्याची धमकी दिली तो २) आचार्य अनिरुध्द (तिवारी) ३) अॅड. अनिल मिश्रा, ४) आजीज भारती, ५) कौशलेस राय या वरील पाचही आरोपींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे













