बाळापुर येथील अनधिकृत कबर तोडण्यासाठी ग्रामस्थांची महापालिकेत निदर्शने…
धुळे शहराजवळील बाळापुर उपनगर येथे अनधिकृत कबर तोडण्यात यावी अशी मागणी करीत ग्रामस्थांतर्फे धुळे महापालिकेत जोरदार निदर्शने करण्यात आली. धुळे शहरातील बाळापुर उपनगर येथील विश्वकर्मा मंदिरा जवळील रासद पिंजारी यांच्या मालकी हक्काच्या राहत्या घरात धुळे महापालिकेची कुठलीही अधिकृत परवानगी न घेता अनधिकृतरित्या कबर बांधण्यात आली आहे. या जागेवर यापूर्वी अशी कुठलीही कबर नव्हती. बाळापुर गावात 95% हिंदू वस्ती असून तिथे बाहेरून आलेले मुस्लिम परिवार दोन समाजातील निर्माण होईल असे कृत्य करीत आहे… त्यांना गावात मशीद व स्वतंत्र दफनभूमी असताना नव्याने कबरीचे उदात्तीकरण का? असा सवाल उपस्थित करीत ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहे…
बाळापूर गावात येणाऱ्या काळात या अनाधिकृत कबर प्रश्न दोन समाजात तेढ निर्माण होईल. त्यामुळे सदर कबर तात्काळ काढण्यात यावी आणि रासद पिंजारी यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.. जर येत्या दोन दिवसात संबंधित अनाधिकृत कबर मनपा प्रशासनाने काढली नाही तर गावकरी स्वतः कायदा हातात घेतील वही कबर तोडून काढतील व या होणाऱ्या सर्व परिणामाला प्रशासन जबाबदार राहील असा देखील इशारा ग्रामस्थांच्या वतीने यावेळी देण्यात आला…













