धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील अजिंठा कॉलनी येथील मोकळ्या जागेवर शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश समन्वयक तथा अजिंठा बुद्ध विहार आणि मेडिटेशन संस्थेचे अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या पुढाकाराने विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन व अजिंठा अभ्यासिकेचे उद्घाटन दि.१८ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
यावेळी परिसरातील महिला भगिनी श्रीमती गंगुताई वाघ, सरोज ताई कदम, सुमनबाई लोंढे, पवारताई, रंजनाताई दामोदर, रंजनाताई इंगळे, कल्पनाताई गुलाले, शशिकलाताई गांगुर्डे, धम्मचारी बागुलताई, कल्पनाताई बोराळकर, सुशिलाबाई गवळी आदी महिलांना भूमिपूजनाचा मान देण्यात आला. महिलांच्या हस्ते कुदळ मारून आणि नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर महिलांच्याच हस्ते अभ्यासिकेचे हित कापून उद्घाटन करण्यात आले. माजी आमदार फारुक शाह यांच्या निधीतून या अभ्यासिकेचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अभ्यासिकेचे दर्जेदार काम पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले. विरंगुळा केंद्राचेही काम अशाच पद्धतीने आनंद लोंढे यांच्या पुढाकाराने केले जाणार आहे. लवकरच फर्निचर चे काम करून अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली केली जाणार आहे. कार्यक्रमाला आनंद लोंढे यांच्यासह सविताताई पवार, सुनंदाताई अहिरे, सोनीताई साळवे, सुमनबाई लोंढे, संजय पवार, रामचंद्र गांगुर्डे, दिलीप गुलाले, संजय गवळी तसेच अजिंठा कॉलनी, तुळजाई सोसायटी, रामनगर, संघमा चौक, कृषी नगर, लुंबिनी वन परिसर, विद्यावर्धिनी कॉलेज परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोराळकर सर व संजय अहिरे यांनी केले.













