एसआयटी चौकशीचा निर्णय रद्द करा : पत्रकार परिषदेत मागणी
हिगाव (ता. शिरपूर) येथील एकाच्या खून प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी फेटाळण्यात यावी, अशी मागणी मृताच्या पत्नीने आयोजित पत्रकार परिषदेत केली.धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेला अँड.प्रतीक्षा कुणाल पाटील ( शिंदे), कुणाल प्रदिप पाटील, जसमाबाई व्हीपसींग पावरा, सुमन कन्हैयालाल पावरा, गौरव शांतीलाल पावरा, रामेश्वर पावरा आदी उपस्थित होते.

संशयित कुंदन प्रकाश पावरा, मुंदन प्रकाश पावरा, शरद प्रकाश पावरा, निलेश गिलदार पावरा, गिलदार सुभान पावरा यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी व गावातील इतर राजकीय व्यक्तींनी केलेली SIT चौकशीची मागणी फेटाळण्यात यावी, अशी मागणी श्रीमती जस्माबाई व्हीपसिंग पावरा (रा. हिगाव ता, शिरपूर, धुळे) यांनी केली. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, त्यानुसार पती व्हीपसिंग कन्हैयालाल पावरा यांची 27 हे 2025 रोजी वर संशयितांनी निर्दयीपणे हत्या केली. सांगवी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिलेली आहे. पोलीस यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण केलेला असून दोषारोप पत्र प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी शिरपूर यांचे न्यायालयात दाखल केले आहे.
संशयित शरद प्रकाश पावरा, निलेश गिलदार पावरा व गिलदार सुभान पावरा यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छ. संभाजीनगर येथे जामीन अर्ज दाखल केलेला असून न्यायप्रविष्ठ आहे. हिगाव गावातील काहींसह संशयीतांच्या नातेवाईकांनी गुन्ह्याची तपासणी ही SIT मार्फत करण्याची मागणी केलेली आहे.
काही वर्षांपूर्वी हिगाव व हिवरखेडा हे गाव एकत्र होते. विभाजन होऊन हिवरखेडा हे वेगळे करण्यात आले. संशयित गिलदार सुभान पावरा हे माजी सरपंच असून गावात राजकीय दृष्ट्या प्रभाव आहे. तसेच सदर गावाचे वर्तमान सरपंच, गावाचे पोलीस पाटील, हिवरखेडा गावाचे सरपंच व पोलीस पाटील हे एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे संशयित व त्यांच्या नातेवाईकांनी राजकीय दृष्ट्या गैरफायदा घेत ग्रामस्थांना दमदाटी करून मागणी पत्रावर स्वाक्षरी केलेची शक्यता आहे. मला व माझ्या नातेवाईकांनाही दमदाटी करून व दबाव टाकून मी दिलेली तक्रार ही माघारी घेण्यात यावी, अशा वारंवार धमक्या दिल्या आहेत.
गावकऱ्यांनी अथवा आरोपीतांच्या नातेवाईकांनी केलेली SIT ची मागणी ही बेकायदेशीर असून त्यांनी दिलेले निवेदन हे राजकीय दृष्टिकोनातून प्रेरित आहे. मागणी ही आपणा मार्फत नामंजूर करण्यात यावी अशी मागणीही श्रीमती जस्माबाई पावरा यांनी केली.












