धुळे : भारतीय चलनाच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या बुलढाणा येथील तरुणाला तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात; 22 हजार 200 रुपयांची बनावट नोटा हस्तगत.गेल्या काही दिवसांपूर्वी मालेगाव येथे भारतीय चलनाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यानंतर धुळे तालुका पोलिसांनी देखील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील चांदे फाटा येथे बुलढाणा येथील रहिवाशी असलेल्या मोहम्मद जफर मोहम्मद कुदुस या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती..
या माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांनी ही कारवाई करीत त्याच्याकडून 500 रुपयांच्या 44 नोटा आणि शंभर रुपयांच्या कागदी बनावट दोन नोटा असा एकूण 22 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी यावेळी दिली…













