धुळे : छत्तीसगढ़ येथील अमित बघेल यांनी भगवान झूलेलाल यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने समस्त सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधी समाजातर्फे उद्या दि 4 रोजी सकाळी ९ वाजता भगवान झूलेलाल मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.

सिंधी समाजाचे प्रथम युवा अध्यक्ष व बजरंग दल धुळे शहराध्यक्ष प्रकाश माधवानी यांनी असे आवाहन केले की समस्त सिंधी समाजबांधव आपापली दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवावी व मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले .यासंदर्भात शहरातील सिंधी समाजबांधवांची बैठक काल रात्री ८ वाजला भावान झुलेलाल मंदिर येथे पार पडली यावेळी अमित बघेल यांच्याविरोधात उद्या निषेध मत्खमोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रकाश माधवानी यांनी उपस्थितांना संबोधित केले ते म्हणाले की, अमित बघेल यांनी समस्त सिंधी समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे. समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्याविषयी आक्षेपार्ह बल्लब्य करुन अवमान केला आहे. भगवान झूलेलाल यांचा अवमान आम्ही कोतत्याही त्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. सिंधी समाजाबद्दल वारंवार आक्षेपार्ह टिप्पणी करुन धार्मिक भावना दुखावण्याचा व समाजात असंतोष पसरविण्याचा जाणूनबुजून प्रयत्न केला जात आहे याविरोधात आपल्याला आवाज उठविण्याची गरज आहे. धार्मिक द्वेष पसरविणान्या अमित बघेलसारख्या अपप्रवृत्तींवर कठोर कारवाई झालीत पाहीजे, त्यासाठी सर्व सिथी समाजबांधवांनी एकजुट दाखवावी, सिंधी समाजाची आस्था, सन्मान व खाणासाठी उद्या सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येईल. या महामोर्चात समस्त सिंधी समाजबांधवांनी सहभागी व्हावे अशी सूचना या ठिकाणी देण्यात आली.













