धुळे : प्रभाग क्र. १२ मधील उशिरा होणारा पाणीपुरवठा सुरळीत करणे बाबत ठाकरे शिसेनेच्या वतीने अनेक निवेदन दिले असून कार्यवाही झाली नाही म्हणून आयुक्तांना पुन्हा स्मरण पत्र देण्यात आले.
ह्या पत्रात असे म्हटले आहे की आमच्या प्रभाग क्रमांक १२ नविन (जुना प्रभाग क्र १०.) मध्ये ८-१० दिवसानी पिण्याच्या पाणी पुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांनचे हाल होत असून एव्हढ्या दिवस पाणी साठा करून परीसरातील नागरिकांना पोटोचे आजार उद्भवत आहेत. तसेच सदर तक्रारीची दखल देखील घेतली जात नाही. यासाठी पाणी पुरवठा अभियंता मा. सोनवणे साहेब यांना वेळोवेळी विचारणा केली असता त्यांनी दरवेळी ठरलेली उत्तर दिले आहेत असा आरोप देखील केला आहे. ह्या ठिकाणी अशी विनंती केली की सदर पिण्याच्या पाण्याची प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा.. अन्यथा शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे यांच्या चंद्रशेखर आझाद नगर परिसर वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असे आवाहन करण्यात आले.













