शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक तीन मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला उमेदवार कमलबाई रवींद्र पाटोळे यांनी 785 मते मिळवून 395 च्या मताधिक्याने विजय मिळविला. विजयानंतर राहुल पाटोळे आणि कार्यकर्त्यांनी कमलबाई पाटोळे यांची विजयी मिरवणूक काढली.
विजयाचे श्रेय विशेष करून महिलांना असून त्यांचा विश्वास सार्थ ठरवू. दलित वस्तीत जास्तीत जास्त विकासाची कामे करू. त्याचबरोबर सामाजिक हिताला नेहमी प्राधान्य दिले जाईल अशी प्रतिक्रिया राहुल पाटोळे यांनी व्यक्त केली.













