शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक 9 मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दीपक सुधाकर देसले हे 160 मतांनी विजयी झाले. त्यांच्या विजयानंतर संपर्क कार्यालया बाहेर जल्लोष साजरा करण्यात आला. या जल्लोषात देसले कुटुंबीयांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जनतेने दिलेल्या संधीचं नक्कीच सोनं करून वॉर्डसाठी मोठ्या प्रमाणावर विकास कामांना गती दिली जाईल अशी प्रतिक्रिया दीपक देसले यांनी विजयानंतर व्यक्त केली.













