धुळे : तालुक्यातील कापडणे येथे ‘आई जोगाई माता जिनिंग अँड प्रेसिंग एल.एल.पी.’ या नूतन प्रकल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. जयकुमार रावल यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव, ग्रामीणचे आमदार राम मनोहर भदाणे, पारोळ्याचे आमदार अमोल पाटील, तसेच प्रसिद्ध जोतिषाचार्य प.पू. श्री. मनिष बीडकर (प्रसन्नता महानुभव आश्रम, पिळनकोठा) हे उपस्थित होते
याव्यतिरिक्त जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, विविध बँकांचे संचालक, सरपंच आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्यास विशेष उपस्थिती लावली या ठिकाणी उपस्थित जिल्हाध्यक्ष बापू खलाने,अरविंद जाधव, बाळासाहेब भदाणे, जिल्हा परिषद सदस्य देवा बापू, जिजाव राव भाऊसाहेब, पंकज कदम, भगवान मोरे, अरुण पाटील, राहुल मुंदडा,विजय देसले, प्रभाकर बुधा, बाजीराव पाटील, आक्काबाई बिल,चेतन शिंदे, किशोर पाटील,स्वप्निल भामरे,ललित बोरसे उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी की कापडणे आणि आसपासच्या परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हा जिनिंग आणि प्रेसिंग प्रकल्प सुरू झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे कापडणे पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव, ग्रामस्थ आणि हितचिंतकांनी या शुभप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते,













