शिरपूर नगर पालिकेच्या झालेल्या निवडणुकीत आमदार अमरीशभाई पटेल यांचा करिष्मा कायम दिसून आला. अमरीशभाई यांचे मार्गदर्शन आणि चिंतन पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे 32 पैकी 31 उमेदवार विजयी झाले. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी चिंतन पटेल यांनी मोठा विजय मिळविला. एका जागी एम आय एम चा उमेदवार विजयी झाला. विकासाचे विजन, शुद्ध पाणीपुरवठा, शाश्वत विकास कामे, दर्जेदार शैक्षणिक आणि मूलभूत सोयी सुविधा अशा प्रगतीच्या कारभारावर जनतेने नेहमीप्रमाणे अमरीशभाई पटेल यांच्यावर विश्वास ठेवून भाजपाचे सर्व उमेदवार निवडून दिले. विजयानंतर अमरीश भाई पटेल यांच्या निवासस्थान आवारात विजयी सभा पार पडली. या सभेला नवनिर्वाचित नगराध्यक्ष चिंतन पटेल, भाजपा ज्येष्ठ नेते बबन चौधरी यांच्यासह विजयी उमेदवार आणि अमरीश भाई यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत मार्गदर्शन करताना आमदार अमरीश भाई पटेल यांनी भविष्यात शिरपूरच्या प्रगतीत मोठ मोठे प्रकल्प आणण्याचे नियोजन आहे. येत्या पाच वर्षात शिरपूरचा आणखी विकास करून पूर्णपणे चेहरा मोहरा बदललेला असेल असे अमरीश भाई आपल्या भाषणातून म्हणाले.













