येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार; प्रचार रॅलीला आमदार मंजुळाताई गावित यांची प्रमुख उपस्थिती
धुळे : ”लढा सन्मानाचा.. शिवसेनेच्या भगव्याचा..” ही घोषणा देत आणि आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करत, सामाजिक न्याय विभागाचे राज्य उपाध्यक्ष आनंदभाऊ लोंढे यांनी आयोजित केलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या रॅलीने संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.

येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आनंद लोंढे यांनी एका भव्य रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि आमदार सौ. मंजुळाताई तुळशीराम गावित यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, हा लढा केवळ सत्तेचा नसून सन्मानाचा आहे. शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आणि विकासाची गती कायम राखण्यासाठी मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणे गरजेचे आहे.या रॅलीत मान्यवरांची उपस्थिती:या प्रचार रॅलीमध्ये महानगर प्रमुख संजय भाऊ वाल्हे, रॅलीचे आयोजक व सामाजिक न्याय विभागाचे राज्य उपाध्यक्ष आनंद लोंढे, तसेच सौ. सविताताई (उर्फ मनीषा) संजय वाल्हे हे प्रामुख्याने उपस्थित होते.रॅली दरम्यान शिवसैनिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. हातात भगवे झेंडे आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या रॅलीत परिसरातील नागरिक, महिला आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.












