धुळे | महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १० मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ साक्री रोडवरील श्री झुलेलाल मंदिर येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला. पारंपारिक पद्धतीने नारळ फोडून आणि विधीवत पूजा करून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटन धुळे शहराचे आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपलकर आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभाग १० मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार सुनील तुळशीराम बैसाणे, सौ. प्रतिभा अनिल पाटील, सौ. किरण राकेश कुलेवार व ललित वीरभान अरुजा यांच्या विजयाचा संकल्प यावेळी करण्यात आला.
भव्य रॅली आणि जंगी स्वागत
प्रचाराच्या शुभारंभानंतर साक्री रोड परिसरातील श्री झुलेलाल मंदिरापासून एका भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली कुमार नगर, पद्मनाभ नगर आणि फुलेनगर या भागांतून मार्गक्रमण करत असताना नागरिकांनी उमेदवारांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत केले. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि ‘भारतीय जनता पार्टी जिंदाबाद’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
या रॅलीत माजी नगरसेवक हर्षभाई रेलन, माजी नगरसेविका कशिश गुलशन उदासी, माजी नगरसेवक गुलशन उदासी, छोटू खरात यांच्यासह राहुल अग्रवाल, बंटी तेसी, अविनाश शिरसाट, रविराज सोनार विशाल केदार, योगेश बिराडे, जयंत शिंदे, राजेंद्र चव्हाण,रवींद्र वाघमोडे, बंटी सोनवणे, नितीन पाटोळे, दत्तू बोंडाळे यांच्यासह असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वातावरण भाजपमय रॅलीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि नागरिकांचा उत्साह पाहता, प्रभाग १० मध्ये भाजपाच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. चारही उमेदवारांना मतदारांचा भरभरून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र असून, या प्रभागात भाजपाने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.












