धुळे: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चे बिगुल वाजले असून, प्रभाग क्रमांक १८ मध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्या प्रचाराचा वेग वाढवला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रवीण अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आज या प्रभागातील उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. खानदेशाचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या ‘श्रीमंत नवसाचा गणपती’ चे दर्शन घेऊन आणि आशीर्वाद घेऊन या भव्य प्रचार मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला.
विकासाच्या मुद्द्यावर मतदारांशी संवाद
प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलताना प्रवीण अग्रवाल म्हणाले की, “श्रीमंत नवसाचा गणपती हे अत्यंत पवित्र स्थान असून संपूर्ण खानदेशात या गणपतीची ख्याती आहे. हजारो भाविकांचे नवस येथे पूर्ण होतात, अशा मंगलमयी ठिकाणाहून आम्ही आमच्या प्रचाराची मोठी सुरुवात केली आहे. परिसरातील नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता, विकासाच्या मुद्द्यावर जनता भारतीय जनता पार्टीच्याच पाठीशी उभी राहील, याची आम्हाला खात्री आहे.”

प्रभाग १८ मधील भाजपाचे उमेदवार:
या निवडणुकीत प्रभाग १८ मधून भारतीय जनता पार्टीने अनुभवी आणि जनसंपर्क असलेल्या महिला उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे सौ. चित्रलेखा विकी बाबा परदेशी (अनुसूचित जाती प्रवर्ग),सौ. रोहिणीताई सोनवणे (अनुसूचित जाती),सौ. सरिता प्रवीण अग्रवाल (सर्वसाधारण प्रवर्ग)जनतेचा उदंड प्रतिसादआज झालेल्या पदयात्रेत उमेदवार आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला आणि मतांचा ‘जोगवा’ मागितला. याप्रसंगी उमेदवारांसह त्यांचा मोठा मित्र परिवार, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. “प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे,” असा विश्वास उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला.या प्रचार मोहिमेमुळे प्रभाग १८ मध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपाने आपली आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.













