धुळे : धुळ्यातील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सोनार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करावे यासाठी चक्क 100 च्या स्टॅम्पवर स्वतःची हमी लिहून दिली आहे त्यात धुळेकर जनतेसाठी अपेक्षित असलेल्या मागण्या पूर्ण करतील असे स्टॅम्प पेपर वर लिहिले आहे.

या ठिकाणी असे उल्लेख केले आहे की मी राजेंद्र गंगाधर सोनार, व्यंगचित्रकार संपादक दैनिक व्यंगनगरी. राहणार प्लॉट नं. 79 फॉरेस्ट कॉलनी नगावबारी देवपूर,धुळे. धुळेकर मित्रांनो, मतदारांनो मी प्रभाग एक मध्ये मनपा निवडणूकीत उभा राहणार आहे. उमेदवारी करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर शपथ घेऊन खालील वचननामा लिहून देतो.① मी धुळे मनपात प्रभागात निवडून आल्यावर विकासकामांच्या ठेक्यात सहभागीदार होणार नाही किंवा नातेवाईकांनाही ठेका मिळेल असा वागणार नाही.
② नगरसेवक पद हे सेवेचे पद आहे. त्यामुळे अवैध मार्गाने संपत्ती कमविण्यासाठी या पदाचा उपयोग करणार नाही.③ माझी धुळयातच नाही तर भारतात कुठेही एक इंच सुद्धा जमीन नाही④ माझ्यावर कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल जाही⑤ माझे बँकेत दोन अकाउंट आहेत. एक करंट व एक बचत दोघात फक्त वत 25,000/- रु बॅलन्स आहे. पाच वर्षानंतर त्याचा लेखाजोखा आपणासमोर ठेवण्यात येईल.⑥ निवडून आल्यावर पाचवर्ष आपल्या समस्या सोडविण्यासाठी उपयोगात आणेल. स्वतःच्या फायद्या साठी नाही.⑦ दोन वर्षानंतर जर आपणास वाटले मी कामे करण्यात अपयशी ठरको तर उमेदवाराला परत बोलाविण्याचा कायदा करण्यासाठी सरकारने कायदा कराता यासाठी प्रयत्न करीन.

आपला उमेदवार- राजेंद्र सोनार. धुळेकर मित्रांनो व प्रभाग एक मधील मतदार बंधू भगिनींनो हा स्टॅम्प आपल्याजवळ जपून ठेवा.निवडून आल्यावर जर मी काम केले नाही तर आपण मला जाब विचारू शकतात.कारण मी फुली वाटणार नाही,कोणतेही प्रलोभन देणार नाही.म्हणून तुम्हाला तो हक्क मिळणार आहे.तेंव्हा ठरवा ठेकेदारी करून संपत्ती कमावणारा उमेदवार हवा की काम करणारा ते आपल्या मतात आहे हातात आहे.तेंव्हा योग्य तो निर्णय घ्या.संपूर्ण महाराष्ट्रात असा स्टॅम्प कुणी लिहून दिलेला नाही तो मी व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार ने लिहून दिला आहे असा उल्लेख या ठिकाणी केला आहे.












