प्रभाग क्र. ९ मध्ये परिवर्तनाची लाट! वंचित बहुजन आघाडीच्या सौ. सोनल खरात यांना मतदारांचा वाढता पाठिंबा
प्रभाग क्रमांक ९ मधील वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी, तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचा आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने, वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. सोनल शंकर खरात यांनी आपला उमेदवारी अर्ज (सर्वसाधारण प्रवर्गातून) दाखल केला आहे. त्यांच्या या उमेदवारीमुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली असून, सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. मात्र, यावेळेस मतदारांचा कल स्पष्टपणे परिवर्तनाकडे असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभागात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे की, आतापर्यंत ज्या-ज्या व्यक्तींना संधी मिळाली, त्यांनी विकासाच्या नावाखाली केवळ स्वतःची तुंबडी भरली आणि भ्रष्टाचार केला. रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांच्या नावाने केवळ आश्वासने दिली गेली. या भ्रष्ट कारभाराला आता जनता कंटाळली असून, नागरिक एका सक्षम आणि प्रामाणिक पर्यायाच्या शोधात होते.
ही पोकळी भरून काढण्यासाठी आणि प्रभागाचा खऱ्या अर्थाने कायापालट करण्यासाठी मतदारांच्या अपेक्षा आता सौ. सोनल शंकर खरात यांच्यावर केंद्रित झाल्या आहेत. अनेक विकासाचे मुद्दे घेऊन त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा प्रश्न असो किंवा वंचित घटकांचा विकास, सोनल खरात यांनी मांडलेल्या ठाम भूमिकेमुळे त्या नक्कीच विजयी होतील, असा विश्वास प्रभागातील जाणकार व्यक्त करत आहेत.
जनतेस आवाहन:
या संदर्भात बोलताना उमेदवार सौ. सोनल खरात म्हणाल्या, “माझी उमेदवारी ही केवळ सत्तेसाठी नसून सेवेसाठी आहे. प्रभागातील भ्रष्टाचाराची कीड संपवून पारदर्शक कारभार देण्याचा माझा मानस आहे. प्रभागातील सुज्ञ नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला एकदा संधी द्यावी. तुमच्या मताच्या अधिकारातून मिळालेल्या या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेन आणि प्रभागाचा आदर्श विकास करेन.”
भ्रष्टाचाराला पर्याय आणि विकासाची नवी आशा म्हणून सोनल खरात यांच्याकडे पाहिले जात असल्याने, प्रभाग क्र. ९ मध्ये त्यांची विजयाची घोडदौड निश्चित मानली जात आहे.











